शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:18 IST)

24वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

बीड मध्ये एका 24  वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेवर बलात्कार करणारा पीडित महिलेचा नात्यात पुतण्या आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या 24 वर्षीय महिलेला तिच्या चुलत पुतण्याने ज्यूसमध्ये घालून गुंगीचे औषध दिले. नंतर तिच्यावर अहमदनगर येथे बलात्कार केला. त्याने त्याचा व्हिडीओ  नंतर दुसऱ्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोघांनी बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केला. या घटनेचा मूळ आरोपी महिलेचा पुतणा अजय गवते   याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपी फरार आहे. आरोपी अजय सोबत त्याचे मित्र पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते आणि परमेश्वर गवते यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार अजय गवतेचा  शोध घेत आहे.