रथाखाली चिरडून 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोनासाठी लावलेले सर्व निरबंध काढण्यात आले आहे. सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे कोणतेही समारंभ होत नव्हते. आता सर्व सण आणि समारंभ साजरे करणे सुरु झाले असता बीडच्या जरुड गावात दोन वर्षांनंतर भरलेल्या यात्रेत आनंदात विरझण पडले आहे. एका चुकीमुळे यात्रेतील आनंद शोककळा मध्ये बदलला. या यात्रेत एका 14 वर्षाच्या मुलाचा रथाच्या चाकेखाली येऊन दुर्देवी अंत झाला. परमेश्वर बरडे असे या मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या जरुड गावात दरवर्षी जागृत देवस्थान भरवनाथाची जत्रा (यात्रा) भरली होती. यात्रेत सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतील गावातून हजारो भाविक येतात आणि मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी होतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा बंद होती. आता या वर्षी ही यात्रा सुरु झाली त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. सर्व भाविक सहभागी झाले असता देवाचा पारंपरिक रथ ओढताना झालेल्या चुकीमुळे रथ ओढत असणारा 14 वर्षाच्या मुलाचा रथाच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला .
या यात्रेत भैरवनाथाच्या रथाला मोठे , लहान मुले, वृद्ध ताऊर्न सर्व ओढतात. रथ ओढताना प्रचंड गर्दी झाली होती. रथ ओढताना परमेशवर नावाचा हा मुलगा खाली पडला आणि त्याच्या वरून रथाचे चाक गेले आणि तो चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे यात्रेत भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे दोन वर्षानंतर भरलेल्या यात्रेला गालबोट लागले आहे.