मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (11:06 IST)

मधमाश्यांच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मृत्यू

death
यवतमाळ मधमाश्यांच्या  हल्ल्यात येडशी येथील उपसरपंच भोला नगराळे यांचा मृत्यू झाला आहे. मुकुटबन येथून 3 किलोमीटर अंतरावरील येडशी झरी येथील उपसरपंच भोला महादेव नगराळे वय ४५ हे कामानिमित्त मुकुटबन येथे आले. दरम्यान काम आटपून परत गावाला ग्रा वि का सोसायटी मध्ये आई सर्वात जास्त मतांनी विजय झाल्यामुळे आनंदाच्या भरात पेढे घेऊन गावाला जात असताना येडशी रेल्वे परिसरात चिंचेच्याझाडाजवळ मधमाशांनी हल्ला केल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुचाकी वेगाने चालवत असताना दुचाकी सहित खाली कोसल्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत वणीला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले उपचादरम्यान
काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला . त्यांच्यामागे पत्नी, मुलगी मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे. शवविच्छेदन अहवाल नंतर त्यात अधिक तपशील पुढे करण्यात येईल .