गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (10:10 IST)

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू

raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळेनिदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत. त्यामुळे 1 मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का याची मोठी उत्सुकता आहे.
 
 पोलीस आयुक्त निखिल गुप्ता  यांनी जामावबंदीचे आदेश देत 5 पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश काढला आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरेयांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरु आहे.