1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Three college friends died in an accident in Solapur

सोलापूरमध्ये हिट अँड रन अपघातात तीन कॉलेज मित्रांचा मृत्यू; चालक फरार

सोलापूरमध्ये आज सकाळी झालेल्या भयानक हिट अँड रन अपघातात तीन कॉलेज मित्रांचा मृत्यू झाला.  
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरमध्ये आज सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन कॉलेज मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण सोलापूर शहर शोककळामय झाले आहे. सकाळी एका अज्ञात वाहनाने तीन तरुणांना चिरडले आणि चालक घटनास्थळावरून पळून गेला.  मृतांची ओळख नागेश गवंडी, रोहन पोरे आणि बसवराज चनशेट्टी अशी आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांनी तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा तपास सुरू आहे.  
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त लाखो लोक जमले