Dharma Sangrah
✕

पालकांनो सावधान! लहान मुलांच्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ

Updated: बुधवार, 10 जानेवारी 2024 (10:14 IST)
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात ही संतापजनक घटना घडली आहे. लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहे.  
 
आरोग्य केंद्रात 6 जानेवारी रोजी खोकल्याच्या उपचारासाठी एका बाळाला आणण्यात आले होते. रुग्णालयात डॉक्टरांनी या बाळाला तपासले आणि त्याला औषधे दिली. यात एक कफ सिरपची बॉटल देखील होती. कफ सिरप देताना सिरप झाकनात ओतून घेतले असता त्यात अळी असल्याचं दिसून आलं. त्यानंतर कुटुंबियांनी हे संपूर्ण औषध खाली ओतून पाहिलं.
 
त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण या बॉटलमधील सिरपमध्ये बऱ्याच अळ्या झाल्या होत्या. यानंतर संबिधतांनी आमदार पडवी यांच्याकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि सदर घटनेबाबत तक्रार नोंदवली.
 
सरकार आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला. तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यासह हा औषध साठा अन्य ठिकाणी देखील गेला असेल तर तो सिल करण्यात यावा आणी संबधित कर्मचारी आणि पुरवठा दारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 
आतापर्यंत जेवणात, स्ट्रीट फूडमध्ये किंवा चॉकलेट आणि बिस्किटांमध्ये अळ्या आढळल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता थेट औषधामध्ये औषधामध्ये अळ्या निघाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं आणि संतापजनक वातावरण पसरलं आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

न्यूझीलंडविरुद्धच्या 'अ' सामन्यांमधून ऋषभ पंत बाहेर, या यष्टीरक्षकाचा समावेश

हसन महमूद कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला बांगलादेशी वेगवान गोलंदाज ठरला

माझी बदली झालेली नाही, भेसळखोरांविरुद्धचा लढा सुरूच राहणार”; तुकाराम मुंडे यांनी बदलीच्या वृत्तांवर केला खुलासा

LIVE: महाराष्ट्रात किसान कर्ज माफी योजनेअंतर्गत ३.५१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुंबईच्या धारावीचा कायापालट होणार, १०,४३२ घरांच्या बांधकामाला सुरुवात

पुढील लेख
Show comments