रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (09:54 IST)

व्यायाम करणे पडले महागात, व्यायाम करतांना तोल गेल्यामुळे गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू

नाशिकमध्ये व्यायाम करताना गच्चीवरून पडल्यामुळे एकामहिलेचा मृत्यू झाला आहे.ही महिला सकाळच्या वेळी दररोज इमारतीच्या गच्चीवर व्यायाम करण्यासाठी जात असे. सकाळी उठल्यानंतर अगोदर गच्चीवर जाणे, व्यायाम करणे, योगा करणे आणि मग दिनक्रमाला सुरुवात करणे, असा तिचा शिरस्ता होता.मात्र घटनेच्या दिवशी महिलेचा तोल गेला आणि ती गच्चीवरून खाली पडली.नाशिकमध्ये अशोकस्तंभ परिसरात ४८ वर्षीय प्रिया सतीश मटुमल ही महिला कुटुंबासोबत राहत होती. रोजच्याप्रमाणे ती सकाळी उठून व्यायाम आणि योगा करण्यासाठी गच्चीवर गेली. मात्र गच्चीवर व्यायाम सुरू असताना तिचा अचानक तोल गेला. या गच्चीत ज्या भागात प्रिया व्यायाम करत होती, तिथे कठडा नसल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यायाम करताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती गच्चीवरून थेट खाली कोसळली. तोल गेल्यानंतर प्रियाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. गच्चीवरून थेट खाली पडू नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यावेळी तिच्या हाती काहीच लागलं नाही. तोल गेल्यामुळे ती सरळ गच्चीवरून जमिनीवर आपटली. या घटनेत जखमी झालेल्या प्रियाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.