शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (14:55 IST)

फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

raj thackeray devendra
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत. मुंबईत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली.
एकनाथ शिंदेगट आणि भाजप या दोघांच्या समन्वयातून महाराष्ट्रात नुकतंच सत्तांतर झालं. यावेळी राज ठाकरे यांनी नव्या सरकारला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या . राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही एकदा थेट भेटायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्याचा उद्देश होता, असं सांगण्यात येत आहे.