गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (21:23 IST)

फडणवीस यांनी घेतली सोमय्या यांची भेट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची मुंबईतील  मुलुंड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी पोलिसांवर विश्वास ठेवून चालणार नाही, मोदींनी दिलेल्या सीआयएसएफच्या संरक्षणाचे नियम पाळा, असा सल्ला फडणवीसांनी  दिल्याचं सोमय्यांनी  सांगितलं. सोबतच सोमय्या यांच्या कोरलाई दौऱ्यानंतर फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यासोबत या प्रकरणावर चर्चा केली. महाराष्ट्राची संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. महाराष्ट्र आपल्याला घोटाळे मुक्त करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. 
 
किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घोटाळ्यांसंबधी चर्चा झाली. याशिवाय गेले काही दिवस माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत त्यावरही चर्चा झाली. पुण्यानंतर काल कोरलईला देखील अधिकृत वेळ घेऊन गेलेलो असताना देखील शिवसेनेचे गुंड तिथे पोहचली कशी? त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली.