शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2022 (21:09 IST)

भुजबळांचा फोटो मॉर्प केल्याप्रकरणी फडणवीसांनी भाजप आमदाराला सुनावले

chagan bhujbal
नागपूर – भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले.सभागृहातील सदस्यच दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित करून ट्रोल करत असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांचे मोबाईलमधील ते छायाचित्र दाखवत हे अतिशय गंभीर आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये त्यांनी सोशल मिडियावर संहिता पाळाव्यात असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.