शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (15:27 IST)

फडणवीस यांनी माहूरगड येथे रेणुका मातेचे व श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले

शनिवारी चैत्र नवरात्र सुरु झाली असून मंदिरामध्ये भक्तांची दर्शनासाठी गर्दी सुरु आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुभावामुळे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य होत नव्हते. मात्र यंदा भक्त मनोभावे दर्शनासाठी मंदिरात जात आहे. अशात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहुरगडावर रेणुका मातेचे दर्शन घेतले. 
 
यावेळी त्यांनी गडावर श्री दत्तप्रभूंचे देखील दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की त्यांनी रेणुका मातेला सर्वांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना केली. तसेच गडावर श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि या दर्शनामुळे पवित्र भावना निर्माण झाल्याचे ते बोलले. त्यांनी म्हटले की ईश्वराकडे आपल्या देशाचे तसेच समाजाचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना केली. त्यांनी गडाच्या विकासासाठी गरज भासल्यास मदतीचं आश्वासन देखील दिलं.