मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (11:56 IST)

विजेच्या खांबावर कर्मचाऱ्याचा मृतदेह

नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील शहापूर येथे वीज वितरण कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करत असताना हा अपघात घडला आहे. धक्कादायक म्हणजे या अपघातानंतर बराच वेळ ज्ञानेश्वर ताटे यांचा मृतदेह खांबावर लोंबकळत होता.
 
ज्ञानेश्वर ताटे असं या वीज वितरण कर्मचाऱ्याचं नाव आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ताटे विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे काम करत असताना यासाठी फोन परमिट घेण्यात आलं होतं. तरीही वीज प्रवाह कसा सुरु झाला, याचं नेमकं कारण शोधण्याची गरज आहे. मृत्यू झाल्यानंतर बराच वेळ ज्ञानेश्वर ताटे यांचा मृतदेह खांबावर लोंबकळत होता. 
 
वीज कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची ही 2 महिन्यामधील दुसरी घटना आहे. याआधी 3 फेब्रुवारी रोजी वीज पुरवठा करणाऱ्या डीपीवर काम करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना हदगाव तालुक्यातील मौजे रावणगाव शिवारात घडली होती आणि अवधूत नागोराव शेट्टे असे या मृत वीज कर्मचाऱ्याचे नाव आहे.