शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (17:19 IST)

बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेळवली येथे काही कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मृत्यूमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्ड फ्लू वाढू नये, यासाठी प्रशासनामार्फत खबरदारी घेत असल्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
 
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले, "ठाणे जिल्ह्यातील वेहळोली वगळता, अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये."
 
किती धोकादायक आहे हा बर्ड फ्लू? नेमका कोणाला आणि कसा होतो आणि आता अंडी किंवा चिकन खाणं बंद करायचं का?
 
बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं
सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लूबद्दल माहिती द्यावी.
पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.
संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद
बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.
जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.
पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.