गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (12:53 IST)

दिवसाढवळ्या तरुणावर अंदाधुंद गोळीबार

Indiscriminate firing on a young man in broad daylight दिवसाढवळ्या तरुणावर अंदाधुंद गोळीबार Marathi Mumbai News In Webdunia Marathi
मुंबईच्या सर्वात गजबजलेल्या ठिकाण म्हटली जाणारी धारावीत दिवसाढवळ्या एका तरुणावर अंदाधुंद गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हल्ल्यात तरुणावर 2 हल्लेखोऱ्यानी गोळीबार केला असून तरुणाला 4 गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. या तरुणाचे नाव आमिर असून तो धारावीत रहिवासी आहे. जखमी तरुणावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात धारावी पोलिसांनी घटनेचा तपास करत 2 मारेकऱ्यांची ओळख पटवली आहे. या प्रकरणात 7 आरोपीना अटक करण्यात आली असून  त्यात 1 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. आरोपींकडून 2 गावठी पिस्तूल, 1 गावठी कट्टा, 15 काडतुसे, 2 चॉपर, 1 कोयता असे हत्यार जप्त केले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आमिर सकाळचे कार्यक्रम आटोपण्यासाठी मोकळ्या मैदानातील स्वछतागृहात गेला होता. परत येताना मैदानात दबा धरून बसलेले 2 जणांनी त्याच्यावर गोळीबार करायला सुरु केले. त्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी टॅक्सीच्या दिशेने पळ काढत असताना आरोपी हल्लेखोर त्याच्या मागे धावले आणि त्याला 2 गोळ्या अजून झाडल्या. या हल्ल्यात त्याला एकूण 4 गोळ्या लागल्या. 
 
त्याच्या एका मित्राने जखमी आमिरला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. आरोपी आणि मयत आमिर हे गुंड प्रवृत्तीचे होते. ड्रग्स तस्करीच्या वादावरून टोळीयुद्धातून हा हल्ला केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धारावी पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.