सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (10:29 IST)

धावत्या ट्रेन मधून उतरणे जीवावर बेतले,रेल्वेची धडक लागून मृत्यू

धावत्या ट्रेन मध्ये चढणे आणि उतरणे हे धोकादायक असते. धावत्या ट्रेन मधून चढ उतर करू नका. असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत असून देखील काही लोक निष्काळजीपणाने आपला जीव मुठीत घेऊन हे करतात. या मध्ये जीव देखील जाऊ शकतो हे त्यांना माहित असून देखील काही लोक धावत्या ट्रेन मधून चढ उतर करतात आणि जीव गमावतात. असाच धावत्या ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न करणे मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्याला महागात पडला असून रेल्वेची धडक लागून त्याचा मृत्यू झाला आहे. 

जीआरपी कडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी घडली आहे. वांद्रे येथून निजामुद्दीन एक्स्प्रेस बोरिवलीला येत असताना हा अपघात झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. रेल्वेत असलेले हे कर्मचारी वांद्रे स्थानकावरून निजामुद्दीन एक्स्प्रेसने बोरिवली स्थानकावर आले आणि बोरिवलीत  धावत्या ट्रेनमधून उतरत असताना धरलेल्या ट्रेनच्या दांड्यावरून त्यांचा हात सुटला नाही आणि ते ट्रेनला धडकले आणि त्यांचा मृत्यू झाला.