गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (12:28 IST)

ऑनलाइन गेम्सच्या चॅलेंजने घेतला 14 वर्षीय मुलाचा जीव, गळफास घेऊन आत्महत्या

मुंबईत मोबाईल गेममुळे एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण भोईवाडा भागातील आहे जिथे एका विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबीयांकडून आव्हान पूर्ण करण्याची आणि ऑनलाइन गेममध्ये अधिक खेळण्याची मागणी केली होती परंतु कुटुंबीय त्याला नकार देत होते, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. या विद्यार्थ्याने गेममधील आव्हान पूर्ण करण्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलल्याचे या घटनेचा तपास करणाऱ्या भोईवाडा पोलिसांकडून समजते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता सातवीच्या या विद्यार्थ्याला फ्री फायर गेम्स खेळण्याची सवय होती. इतर काही खेळांसोबत या गेमवर भारत सरकारने बंदी घातली असली तरी हा गेम छुप्या पद्धतीने खेळला जात आहे. या विद्यार्थ्याचे व्यसन नव्हते, असे मुलाच्या पालकांचे म्हणणे असले तरी तो अधूनमधून फ्री फायर गेम खेळत असे.