मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मार्च 2022 (08:35 IST)

मुद्रांक शुल्कातून उद्दिष्टाच्या आठ कोटी अधिक शासनास महसूल ,उद्दिष्ट 339 कोटींचे; जमा झाले 347 कोटी

सोलापूर राज्य शासनाने मुद्रांक शुल्क कार्यालयास चालू आर्थिक वर्षाकरिता 339 कोटी रुपये महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार मुद्रांक शुल्क कार्यालयाने दमदार कामगिरी करीत आणखी आठ दिवस शिल्लक असताना उद्दिष्टाच्या तब्बल आठ कोटी अधिक म्हणजेच 347 कोटींचा महसूल जमा करून शासनाच्या तिजोरीत भर टाकली आहे.
 
मुद्रांक शुल्क कार्यालयाकडे 23 मार्चपर्यंत 85 हजार 866 दस्त नोंदणीतून 347 कोटी 49 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. याची टक्केवारी 105 इतकी असून 31 मार्चअखेरपर्यंत यात वाढ होऊन ती 115 टक्केपर्यंत जाईल, असा विश्वास मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला एप्रिल महिन्यात चार हजार 755 दस्तनोंदणीतून 12.52 कोटी, मे महिन्यात एक हजार 848 दस्त नोंदणीतून 14.54 कोटी, जून महिन्यात आठ हजार 389 दस्त नोंदणीतून 27.84 कोटी, जुलै महिन्यात आठ हजार 663 दस्त नोंदणीतून 31.13 कोटी, ऑगस्ट महिन्यात आठ हजार 241 दस्त नोंदणीतून 33.45 कोटी, सप्टेंबर महिन्यात सात हजार 56 दस्त नोंदणीतून 32.31 कोटी, ऑक्टोबर महिन्यात सात हजार 209 दस्त नोंदणीतून 33.17 कोटी, नोव्हेंबर महिन्यात सात हजार 551 दस्त नोंदणीतून 30.98 कोटी, डिसेंबर महिन्यात सात हजार 642 दस्त नोंदणीतून 37.10 कोटी, जानेवारी महिन्यात आठ हजार 852 दस्त नोंदणीतून 34.11 कोटी, फेब्रुवारी महिन्यात आठ हजार 765 दस्त नोंदणीतून 36.37 कोटी तर मार्च महिन्यात सहा हजार 895 दस्त नोंदणीतून 23.97 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.