पीककर्ज वाटपाच्या गंभीर संकटामुळे विदर्भ मराठवाड्यात कृषी संकट वाढणार
पश्चिम विदर्भातील पीक कर्ज वाटपाला अजुनही गती मिळालेली नाही. कर्जमाफीविषयी मंत्र्यांची बेजबाबदार विधाने आणि त्यामुळे शेतकर्यांनी संभमावस्थेत कर्जाची परतफेड न करणे, बँकांची वसुली कमी होणे या सर्व बाबींचा परिणाम कर्ज वितरणावर झाला असून या स्थितीत शेतकर्र्यांना अखेरीज खाजगी सावकारांकडे धाव घ्यावी लागेल आणि शेतकर्र्यांच्या आत्महत्या वाढतील अशी भिती स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अद्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात उद्दीष्टांच्या तुलनेत केवल १४ टक्केच कर्जवाटप झाले आहे. कर्ज वितरणाला वेग आणण्यासाठी प्रशासनाने आता कर्ज वाटप शिबिराचे आयोजन केले आहे परंतु त्याला बँकांकडून मिळत असलेला असहकार्य या पार्शव भुमिवर किशोर तिवारी यांनी कृषी संकट शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ मराठवाड्यात अधिक गंभीर होणार असा अहवाल सरकारकडे दिला असुन, उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाल्यानंतर येथील राजकीय नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या.
शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी हात आखडता घेतला. त्यामुळे बँकेचे अधिकारी हे जिल्हा प्रशासनाकडे वसुलीसाठी मदत करा, असा तगादा लावत आहेत. यावेळी कर्ज वितरण विस्कळीत होऊन गेले आहे. सरकारने पतपुरवडा तात्काळ नियमित करणे व त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणे काळाची गरज झाली आहे .