सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2017 (16:38 IST)

कर्ज माफीमध्ये भूमिहीन शेतकऱ्यांच्या समावेश करा -किशोर तिवारी :सरकारला सादर केली पंचसुत्री

शेतकरी चळवळीचे  कार्यकर्ते किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शेती  
स्वावलंबन मिशन (व्हीएनएसएसएम) ने विदर्भ, मराठवाडा  भागांतील भूमीहीन शेतकऱ्यांच्या गंभीर  परिस्थितीबद्दल सखोल अभ्यास करून शहरात राहणारे नेतेगीरी, सरकारी नौकरी, व्यवसाय करणारे सर्वच श्रीमंत शेतकऱ्यांनी गावातील आदीवासी, दलीत, भटक्या व इतर मागास वर्गातील भूमिहीन वा अल्प भुधारक शेतकऱ्यांना जमीन भाडेपट्टीने दिली असुन महाराष्ट्रातील कुळ कायद्याच्या तरतुदींमुळे  वहीतदारांच्या यादीत या भूमीहीन शेतकऱ्यांचे नाव न नोंदविल्यामुळे होत असलेल्या अन्यायाकडे  सरकारचे लक्ष वेधले असुन या वंचितांचे हित जोपासण्याकरीता तिवारी यांनी सरकारला पंचसुत्री दिली आहे . 

 
शेतकरी मिशनने आपल्या अहवालात म्हटले आहे की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आदीवासी, दलीत ,भटक्या व इतर मागास वर्गातील भूमिहीन वा अल्प भुधारक शेतकरीचं असुन मात्र कर्जमाफीसह इतर सर्व सवलती व योजनांच्या लाभ उच्च जातीच्या स्वतः  मर्द म्हणुन ओळख दाखविणाऱ्या सतत सत्तेत राहणाऱ्या श्रीमंत पोटभरू शेतकऱ्यांनीच घेतला असुन आता यांना कर्जमाफीसह इतर सर्व सवलती व योजनांच्या फ़ायद्यापासून वंचित ठेवण्यासाठी कायद्यामध्ये तात्काळ बदल करण्याची तसेच जमिनीच्या भाडेकरू कायद्यात शेती मालकी आणि भाडेकरु शेतकऱ्यांचे हक्क पुर्णपणे  सुरक्षीत ठेवण्यासाठी डॉ हक समितीच्या नीती आयोगादिलेल्या व सर्व राज्यांना  तात्काळ लागु करण्याच्या केंद्रांच्या आदेशाची योग्य अंबलबजावणी करून दुरुस्ती लागु करण्याची मागणी  सरकारला सादर केली  आहे .