मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजपचे टी शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide by wearing BJP T-shirt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुलढाणा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे टी शर्ट घालून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असा संदेश लिहिलेले टी शर्ट घालून राजू तलवारे नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. 
 
बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील खातखेड या गावातील ही घटना घडली. सदरच्या युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.