गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (10:21 IST)

सी.एम. आले पुढे, पीएमसी बँकेच्या प्रकरणी कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस

ठाणे जिल्ह्यात महायुतीच्या जाहीर सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभा झाल्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी घेराव केला होता, त्भायावेळी भावुक झालेल्या खातेदारांनी प्रश्न विचारला की, 'आमचे पैसे मिळणार का नाही?, तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की 'कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

फडणवीस पुढे म्हणाले की 'आता निवडणूक असल्याने सध्या काहीही करता येणार नाही, मात्र ज्या दिवशी निवडणूक संपेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालणार असून, यासंदर्भात निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी खातेदारांना सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांचा आश्वासनानंतर काही प्रमाणात खातेदारांना दिलासा मिळाला. देशात आणि राज्यात पीएमसी बँक बुडाली त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या निर्बंधानंतर सर्वच खातेदार बेहाल झाले असून, ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनाच खातेदारांचा सामना करावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांचे जाहीर भाषण झाल्यानंतर काही खातेदारांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या आतमध्ये पीएमसी बँकेच्या विरोधात पोस्टरबाजी केली तसेच बँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री भाषण संपवून निघत असतानाच खातेदारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री या सर्व खातेदारांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी स्वतः खातेदारांकडे गेले. त्यानंतर त्यांनी स्वतः सर्व खातेदारांचे म्हणणे एकूण घेतले.