शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (15:38 IST)

'या' कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही : मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह सहकारी बँकेच्या ७० संचालकांवर मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांकडून बोले जात आहे. यावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘या ईडीच्या कारवाईमागे कोणताही राजकीय अजेंडा नाही. आम्ही कोणाशी ही सुडबुद्धीने वागत नाही. ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची कारवाई आहे. त्यामुळे ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असे म्हणे चुकीचे आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.