सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (17:07 IST)

मुंबईत खारमध्ये 5 मजली इमारतीचा भाग कोसळला

मुंबईच्या खार पश्चिमेला एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप जिवीतहानीचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.
 
पूजा अपार्टमेंट नावाच्या या इमारतीचा मधला भाग अचानक कोसळला. खार रोड क्रमांक १७ वर ही इमारत आहे. कोसळेला भाग लिफ्ट आणि जिन्याकडचा असल्याचे सांगितले जात आहे. 10 वर्षीय चिमुकल्यासह काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.