मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:04 IST)

राहुल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, पक्ष चालवत येत नाही ते देश काय चालवणार

भाजप सोबत सत्तेत असलेल्या एक नेत्याने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. आठवले यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हि उभे केले आहे. आठवले यांनी म्हटले की, मागची पाच वर्षे देशात उत्तम  काम केले तरी देखील काहीजणांनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. तरीही देशाच्या जनतेने ठरवलं आहे की, मोदी शिवाय त्यांना दुसरा पर्याय अजूनतरी नाही. सोबतच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना आठवले म्हणतात की, जर राहुल गांधी आपलाच काँग्रेस  पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील, तर ते देश कसा काय चालवतील? त्यांचा यामुळे  अमेठीतून पराभव झाला.या अगोदर आठवले यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, इतर पक्षांची महायुती २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २४० ते २५० जागांवर विजयी होईल. त्यांनी हे देखील वक्तव्य केले होते. जागा वाटपावर भाजपा-शिवसेनेने छोट्या मुद्यांना सोडून दिले पाहिजे आणि आपल्या ताकदीच्या आधारे जागांचे वाटप करायला हवे व निवडणूक लढायला हवी असे म्हटले आहे.