रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (15:57 IST)

आता तो काळ संपला, आम्ही जिथे जातो तिथे लोक स्वत: येतात : मुख्यमंत्री

एका जमान्यामध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी लोकांच्या मागे जावे लागायचे. पण तो काळ आता संपला आहे. आम्ही जिथे जातो तिथे लोक स्वत: येतात. पक्षात प्रवेश करण्यासाठी लोक आता स्वत: भाजपाचे झेंडे घेऊन येतात. सोबत फोटो काढतात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
ताकत कितीही असली तरी पक्ष विस्तार चालू राहिला पाहिजे. सगळयांनाच भाजपामध्ये यायचे आहे पण आम्ही ठराविक निवडून लोक घेत आहोत असे फडणवीस म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कारभार चालू आहे. त्यामध्ये त्या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना पुढचे २० ते २५ वर्ष स्वत:चे भविष्य दिसत नाही. राजकारण करायचे असेल तर भाजपा-मोदीसोबत आले पाहिजे असे त्यांना वाटते असे त्यांनी सांगितले.