शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (15:51 IST)

सुमीत राघवने आदित्य ठाकरेंना रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सुनावले

Sumit Raghav heard Aditya Thackeray from a road mishap
सुमीत राघवनं ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सुनावलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणुकीची घोषणा होताच आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. 'निवडणुकीची घोषणा झालीय. लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय. 'तुमचं सरकार, तुमचं भवितव्य घडवण्याचा अधिकार बजावण्याची वेळ आलीय. हीच ती नवा महाराष्ट्र घडवण्याची वेळ आहे,' असं आदित्य यांनी ट्टिवमध्ये म्हटलंय.
 
आदित्य यांच्या या 'नव्या महाराष्ट्रा'च्या ट्विटवर सुमीतनं अत्यंत बोचरी प्रतिक्रिया दिलीय. 'नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल,' असं त्यानं म्हटलंय. सोबत #येरेमाझ्यामागल्या असा हॅशटॅगही दिलाय.