शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (15:44 IST)

शाळेतील सात वर्षीय मुलीवर आठ महिने बलात्कार

बातमी वाचून संताप होणार आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उभा राहणार आहे. ही घटना कल्याण येथील असून, कल्याणमध्ये सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. यामध्ये आरोपींपैकी दोघं दुकान मालक आहेत, एकजण केटरर आहे. मुलीच्या शाळेजवळ असणाऱ्या एका जीर्ण आणि बंद पडलेल्या इमारतीत आरोपींनी जवळपास आठ महिने मुलीवर बलात्कार करत होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, “मुलीच्या पालकांनी शाळेतून घरी येण्यासाठी रिक्षा भाड्याने केली होती, मात्र. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर रिक्षाची वाट पाहत थांबायची, नेमका या गोष्टीचा  फायदा आरोपी नवीन, अजय आणि विक्रम पुरोहित यांनी घेतला. नवीन याचं कपड्याचं दुकान असून अजय याचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तर विक्रम हा बॅग विकण्याचा व्यवसाय करतो”. या घटनेमुळे शाळेबाहेर परिसरातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. याप्रकरणी शाळेच्या कर्मचाऱ्यांची पोलीस चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.
 
पीडित मुलीच्या वागण्यात बदल जाणवल्यानतंर ही घटना उघडकीस आली. आजीने मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. शाळा सुटल्यानंतर तीन लोक आपल्याला निर्जनस्थळी खेळण्यासाठी घेऊन जातात असं मुलीने आजीला सांगितल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ आपला मुलगा आणि सुनेला या प्रकाराबद्दल सांगितलं. मुलीच्या पालकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत याबद्दल तक्कार दाखल केली.
 
“तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर बलात्कारासहित पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे.