1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (15:48 IST)

ओल्या सेलिब्रेशनला ब्रेक ऑक्टोबर मध्ये आठ दिवस ड्राय डे

Dry Day eight days in October
ऑक्टोबर महिन्यात दसरा व  दिवाळी हे दोन अत्यंत महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता पार्टी, नाईट आऊट करण्याचा प्लॅन करतात. मात्र ऑक्टोबर महिन्यात ओल्या पार्टीची अर्थात मद्यप्राशन करण्याचा प्लॅन करत असाल. तर तळीरामांची चांगलीच पंचाईत होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 8 दिवस ड्राय डे आहेत. त्यामुळे राज्यभरातील तळीरामांना विना गळा ओला करताच साजरा करावे लागणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिला ड्राय डे असू, बुधवारी 2 ऑक्टोबरला गांधी जंयती आहे. विदेशी मद्य, देशी दारू, ताडीची दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी 8 ऑक्टोबरला दसरा आहे. रविवारी 13 ऑक्टोबरला वाल्मिकी जयंती असल्याने दारुची दुकाने बंद राहणार आहेत. सोमवारी 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान असून, त्यापूर्वी 48 तास मद्यविक्रीस बंद असणार आहे. शनिवार 19 ऑक्टोबर, रविवार 20 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राज्यात मद्यविक्री बंद आहे. सोमवारी 21 ऑक्टोबर विधानसभेसाठी मतदान होणार असल्याने त्या दिवशी दारुची दुकानं बंद असतील, तर गुरुवारी 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार असल्याने त्या दिवशीही दारु विक्री पूर्णपणे बंद असणार आहेत. रविवारी 27 ऑक्टोबरला नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन असल्याने विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने बंद राहणार आहेत.