शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (15:24 IST)

तर छगन भुजबळ यांना जन्मठेपेची शिक्षा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची जेलवारी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांविरुद्ध आणखी दोन सुधारित कलमं वाढवली आहेत. विशेष म्हणजे भुजबळ दोषी आढळले तर जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
 
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मंगळवारी नव्या कलमांचा ड्राफ विशेष कोर्टात सादर केला. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह 14 जणांची नावं आहेत.  यामध्ये भुजबळांचा मुलगा आमदार पंकज आणि पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांची नावं आहेत.
 
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण मग ईडीने हाती घेत तपास केला. त्यादरम्यान भुजबळांची तब्बल 200 कोटींची मालमत्ता जप्त केली.
 
या तपासादरम्यान भुजबळांविरुद्ध महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने सुधारित कलमे लावून हा खटना आणखी मजबूत करण्यात आला. या कलमांतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.