1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. farmer loan waiver second list announce by maha vikas aaghadi

शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत 68 गावांतील 15358 शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा यामध्ये समावेश होता. आता कर्जमाफीची दुसरी यादीही जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीतील वर्धा जिल्ह्यातील माहिती समोर आली आहे. 
 
दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 154 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.  उर्वरित 12 पैकी 8 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण न झाल्याने तर चार शेतकरी मृत आल्याने सध्या लाभापासून वंचित आहे. याबद्दल वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा सुरु आहे.
 
8 आधार ऑथेंटिकेशन न झालेले शेतकरी आधार नंबर बँक अपलोड करेल किंवा कोण याबाबत चर्चा सुरु आहे. तर  154 शेतकऱ्यांपैकी 112 शेतकऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 5 लाख 94 हजार रुपये जमा झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात 61084 लाभार्थी शेतकऱ्यां यापैकी 57 हजार 733 शेतकऱ्यांचे आधार अपडेट आहे. तर 11 हजार 143 शेतकऱ्यांची यादी अद्यापही बाकी आहे.
 
पुढील लेख
रश्मी ठाकरे यांची ‘सामना’ च्या संपादकपदी वर्णी, शिवसेना मुखपत्राच्या बनल्या पहिल्या महिला संपादक