शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (17:06 IST)

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर झाली होती, तर दुसरी यादी उदया शुक्रवारी जाहीर होणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे.
 
कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखत्याची पहिली यादी घोषित केली आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हैरफाटे मारायला लागू नये. यामध्ये अचूकता यावी हा टप्प्याने याद्या जाहीर करण्याचा उद्देश आहे असे सांगून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी २८ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी जाहीर होईल अशी माहिती दिली आहे. पहिल्या यादीमध्ये अद्याप तरी त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले नाही.