शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (16:17 IST)

फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असा प्रश्न विचारला होता. परंतु आदित्य ठाकरेजी, सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ अंकावर बंदी घालण्याची हिंमत तुमच्या सरकारमध्ये आहे का?’ असा थेट सवाल फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना विचारला. 
 
 ‘मी आधीच बोललो होतो, की बांगड्या घालण्याचं वक्तव्य कोणाला आवडणार नाही. त्यामुळे मी गप्प बसणार का, असं म्हटलं. परंतु त्यांनी माझं भाषण पूर्ण ऐकलं असतं, तर असं वक्तव्य केलंच नसतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण होईल, याची कल्पना त्यांना होती, त्यामुळे या वादाला बगल देण्यासाठी त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला. पण आदित्य ठाकरेजी, सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालण्याची हिंमत तुमच्या सरकारमध्ये आहे का? आधी हे सांगा, मग बाकीच्या गोष्टी बोलू’ असं चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.