1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. farmers-protest-yevla-stone-pelting-on-police

संपाला हिंसक वळण : पोलिसांकडून हवेत गोळीबार

येवल्यात पिंपळगाव जलाल टोलनाका परिसरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हवेत केलेल्या गोळीबारात एक जखमी झाला आहे, तर चार ते पाच पोलीस जखमी झाले आहेत. सध्या या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी वारंवार लूट करणाऱ्या आंदोलकांना आटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे, तर चार ते पाच पोलीसही जखमी झाले आहेत. दरम्यान सकाळपासून बंद असलेला मनमाड येवला मार्ग बंद होता. संध्याकाळी उशिरा हा रस्ता सुरु करण्यात आला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुढील लेख
मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस, राष्ट्रवादीला टार्गेट