रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , मंगळवार, 6 जून 2017 (11:18 IST)

शेतकरी संपाचा सहावा दिवस संपला प्रतिसाद कायम

शेतकऱ्यांचा संपाचा आजचा आज सहावा दिवस आहे.तर आता  संपाचं केंद्र बनलेल्या नाशकातल्या कृषीउत्पन्न बाजार समितीत भाजीपाला मार्केटमध्ये माल आलेलाच नाही. त्यामुळे शहरात मोठ्याप्रमाणात भाजीपाल्याचा तुटवडा  निर्माण झाला आहे. तर अनेक व्यापारी आणि इतर विक्रेत मोठ्या प्रमाणात भाजी चढ्या दरात विकत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.

तर पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे.  पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली आहे. पुणे मार्केट यार्डात दररोज साधारण 1200 ते 1300 गाड्यांची आवक होते  आज पन्नास टक्के आवक झाली. मात्र त्यामुळे भाजीपाला किंमती थोड्या कमी होन्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर येथील असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधे भाजीपाल्याची  नेहमीपेक्षा थोडी कमी अवक झाली आहे. तर रोज नेहमी  सरासरी 1800 क्विंटल भाजीपाल्यांची आवक असते मात्र संप सुरु आहे म्हणून  आज मात्र आवक निम्यावर, ८८८ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे.