हिमाचलच्या चंबामध्ये भीषण बस अपघात, ७ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी
चंबा बस अपघात: हिमाचल प्रदेशातील चंबा येथे शनिवारी सकाळी एका भीषण बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्राने (एसईओसी) दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील बैरागढ येथील पटवार सर्कल अंतर्गत चालुंज वळणाजवळ सकाळी ७:१५ वाजता एक खाजगी बस रस्त्यावरून घसरून कोसळली. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये अंदाजे १५ ते १६ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक गावकरी तात्काळ घटनास्थळी जमले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. गावकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जखमींना बसमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.
Edited By - Priya Dixit
