मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मार्च 2025 (09:27 IST)

नागपुरात छेडछाडीला निषेध करणाऱ्या वडिलांची हत्या, तिघांना अटक

murder
नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यात परिसरात एक ह्र्दयद्रावक घटना घडली. जिथे एका वडिलाना आपल्या मुलीच्या छेडछाडीच्या निषेध केल्याबाबद्दल मोठी किंमत मोजावी लागली काही गुन्हेगार एका तरुणीची छेड काढत होते जेव्हा वडिलांनी याचा विरोध केल्यावर आरोपींनी तरुणीच्या वडिलांची भर रस्त्यावर निर्घृण हत्या केली. नरेश वालदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण बऱ्याच काळापासून मुलीला त्रास देत होते. तरुणीच्या वडिलांनी विरोध केल्यावर आरोपींचा वडिलांशी वाद झाला नंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. 
 बुधवार 26 मार्च रोजी नरेश वालदे हे त्यांच्या कामात असताना त्यांना एका अनोळखी नंबर वरून फोन आला आणि समोरच्या वक्तीने त्यांना जट्टारोडी परिसरात भेटण्यासाठी बोलावले. नंतर नरेश तिथे पोहोचल्यावर आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला आणि तिथून पसार झाले. नरेश यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. 
 ALSO READ: कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि शव विच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit