शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025 (11:04 IST)

नागपुरात दाम्पत्याने एका व्यावसायिकाला 2.32 लाख रुपयांने गंडवले, गुन्हा दाखल

Nagpur News: सध्या ऑनलाईन फ्रॉडचे प्रकरण वाढत आहे. जास्त लोभापोटी अनेक वेळा लोक फसवणुकीला बळी पडतात. एका व्यावसायिकाला गुंतवणुकीवर मोठे परतावे देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने 2.32 लाख रुपयांने गंडवले.व्यावसायिकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 
नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी शंकर नगर येथील राजीव निहालचंद वासानी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. राजीव यांचा चारचाकी वाहनांचे सुटे भाग विक्रय करण्याचा व्यवसाय आहे. त्याचे दुकान आहे. त्यांनी भद्रे नावाच्या दाम्पत्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. आरोपी भद्रे हा 2018 मध्ये टेक्सी चालवण्याचे व्यवसाय करायचा आणि गाडीचे सुटे भाग खरेदी करण्यासाठी  राजीव यांच्या दुकानावर यायचा.
ते एकमेकांना ओळखायचे. आरोपीने राजीव यांना सांगितले की त्यांच्या पत्नीने भाग्यश्री नगर मध्ये महिला पतसंस्था सुरु केली आहे जिथे पैसे जमा केल्यावर चांगला परतावा मिळेल. तसेच खात्यातून कधीही कर्ज घेतले जाऊ शकते. 

जून 2023 ,मध्ये आरोपी राजीव यांच्या दुकानात आला आणि नवीन खाते उघडण्यास सांगितले. त्या खात्यात दररोज 2000 रुपये जमा करण्याचे ठरले. नंतर राहुल काटे नावाचा एजन्ट येऊन पैसे घेऊन जायचा आणि शिक्का लावायचा. राजीवच्या खात्यात 16 जून ते 23 डिसेंबर 2023पर्यंत  क्रेडिट संस्थेत 2.32 लाख जमा केले. 
मुलीच्या शाळेची फी जमा करण्यासाठी राजीव 2024 मध्ये पैसे काढण्यासाठी पतसंस्थाच्या कार्यालयात गेल्यावर संस्था सध्या तोट्यात आहे म्हणून पैसे काढता येणार नाही असे सांगण्यात आले. नंतर आरोपी कडे पैसे मागितल्यावर त्यांनी बहाणे करून पैसे  देण्यास नकार दिला. अखेर राजीव यांनी पोलिसांकडे धाव घेतली. भद्रे दाम्पत्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit