रविवार, 9 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 फेब्रुवारी 2025 (12:45 IST)

नागपुरात लिव्ह इन पार्टनरने संबंध तोडल्यावर प्रियकराने पोलिस ठाण्यात विषप्राशन केले

नागपुरात 27 वर्षीय लिव्ह इन पार्टनरने तरुणाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून संबंध संपुष्टात आणल्यामुळे प्रियकराने आपले आयुष्य संपवण्यासाठी विष प्राशन केले.ही घटना शनिवारी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 
तरुणीने तिच्या लिव्ह इन पार्टनरसोबतचे नाते संपवले. यामुळे तरुण चांगलाच संतापला. तो त्याच्या पूर्वीच्या जोडीदाराच्या घरी गेला आणि त्याने मुलीशी भांडणच केले नाही तर तिच्या आईसोबत जोरदार वादही झाला.तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलवले. तरुणाने पोलिस ठाण्याच विषप्राशन केले. तरुणाच्या या कृत्याने पोलिसांना आश्चर्य झाला आणि पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, सागर नावाच्या या व्यक्तीचे गेल्या 2 वर्षांपासून एका तरुणीशी प्रेम होते. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. सागरला दारुचे व्यसन होते. तो काही हे सोडत नव्हता. त्याने तरुणीला मारहाण करण्यास सुरु केले. तरुणीने कंटाळून नाते तोडून आई वडिलांकडे गेली. 

सागर शनिवारी सकाळी तरुणीला भेटण्यासाठी आणि समजवण्यासाठी तिच्या गहरी गेला. तरुणी आणि तरुणीच्या आईने ती येणार नसल्याचे सांगितल्यावर तो वाद करु लागला. त्याने मारहाण करण्यास सुरु केले. या वर तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
पोलिसांनी सागरला पोलिस ठाण्यात बोलवले. त्याने विष आपल्या सोबतच नेले असून त्याने पोलिस ठाण्याच विष प्राशन केले. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केले असून या प्रकरणाचा तपास करत आहे.  
Edited By - Priya Dixit