नागपुरात जोडप्याला अनियंत्रित कंटेनरने चिरडले, दुचाकीचालक पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारातून परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या जोडप्याला पाठीमागून नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक पतीचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृति चिंताजनक आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी हा भीषण अपघात झाला.मोरेश्वर गावंडे, वय 64, रा. गाडगेनगर, असे मृताचे नाव आहे.तर त्यांच्या पत्नी शीला मोरेश्वर गावंडे या अपघातात गंभीर जख्मी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
विशेष म्हणजे अपघाताच्या वेळी मोरेश्वरने हेल्मेट घातले होते. मात्र, धडक इतकी भीषण होती की, हेल्मेटचा चक्काचूर झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर हा एका बिल्डरकडे सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. मोरेश्वरच्या मावशीच्या मुलीचे निधन झाले होते. मोरेश्वर त्याची पत्नी शिलासोबत दुचाकीवरून बहिणीच्या अंत्यविधीसाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास गावंडे दाम्पत्य अंतिम संस्कार करून घरी परतत होते.
दरम्यान,कंटेनरचालक बेदारकारपणे भरधाव वेगाने वाहन चालवत होता . त्याने दुचाकीला मागून धडक दिली.त्यानंतर पती-पत्नी वाहनासह खाली पडले. दरम्यान, ट्रकने चिरडल्याने मोरेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला.तर पत्नी गंभीर जखमी झाली. अपघाताचे पाहुन आसपासचे नागरिक धावत मदतीला आले .त्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मोरेश्वर व शिला यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी मोरेश्वरला मृत घोषित केले, तर शीला यांच्यावर उपचार सुरु आहे.
अपघाताच्या वेळी मोरेश्वरने हेल्मेट घातले होते. पण ते निकृष्ट दर्जाचे हेल्मेट होते, जे फूटपाथवर 100-200 रुपयांना मिळते. कंटेनरच्या धडकेने हेल्मेट पूर्णपणे तुटले. जर त्याने चांगल्या दर्जाचे हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचा मृत्यू झाला नसता. अशी चर्चा अपघातानंतर अपघातस्थळी झाली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Edited By - Priya Dixit