शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (09:39 IST)

5 फेब्रुवारी भाजपकडून राज्यभर वीज दरवाढी विरोधात आंदोलन

येत्या 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर वीज दरवाढी विरोधात भाजपा आंदोलन करणार आहे. राज्यातील सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपा आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. कोअर कमिटीमध्ये वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याची भूमिका ठरवण्यात आली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे सह प्रभारी शिवप्रकाश उपस्थित आहे. अर्थसंकल्पाचा प्रसार प्रचार, आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूक संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी भाजपची बैठक झाली.