शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2024 (16:23 IST)

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

water death
सोलापूरमध्ये एका महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज तलावात उडी घेतली. वेळीच नागरिकांनी आरडाओरड करून बोटिंगमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी पाण्यात उडी घेत तिचा जीव वाचवला. 
नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखत सतर्कता दाखवल्यामुळे महिलेचा जीव वाचला. 
 
सदर घटना सोमवार दुपारची असून सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळ एक महिला पिवळा ड्रेस मध्ये उभी होती.अचानक या महिलेने पाण्यात उडी घेतली. तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी आरडाओरड केली आणि तिला वाचविण्यासाठी बोटिंग क्लब मध्ये काम करणाऱ्या तरुणांनी ताबडतोब पाण्यात उडी घेत तिचा जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार घरगुती वादाला कंटाळून तिने असं केलं.ही सम्पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 
 
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पिवळा सलवार सूट घातलेली महिला तलावाजवळ उभी असल्याचे दिसत आहे.तिने आपले तोंड झाकले आहे. अचानक ती पाण्यात उडी घेते. तिथे उपस्थित लोकांनी तिला वाचवण्यासाठी आरडाओरड केला नंतर बोट क्लबचे तीन कर्मचारी पाण्यात उडी घेतात आणि तिला वाचवण्यासाठी ट्यूब देतात मात्र ती ट्यूब धरत नाही. तर दोन कर्मचाऱ्यांनी तिला ओढत बाहेर काढले आणि तिचा जीव वाचवला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit