1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
  4. Sharad Pawar attacked Prime Minister Narendra Modi and BJP

शरद पवारांनी भरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला

लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. सध्या राज्यात नेते सभेत प्रचारामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. आता सोलापुरातील माढा तालुक्यात शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेत पंतप्रधान नरेंद्रमोदी आणि भाजपवर हल्ला बोल केला आहे.  

ते म्हणाले, मोदी यांची वाटचाल सध्या हुकूमशाहीच्या दिशेनं सुरु आहे. त्याशिवाय त्यांनी मोदींच 2014 मधील एका भाषणाची क्लिप ऐकवली.मोदींनी या 10 वर्षात फक्त नोटबंदी केल्याचं ते म्हणाले. या क्लिप मध्ये मोदींनी 50 दिवसांच्या आत पेट्रोलची किंमत 50 टक्के खाली आणायचं आश्वासन दिल होत.पण आता पेट्रोलचे दर वेगाने मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गॅस 1100 रुपये आहे. बेकारी कमी करण्याचं मोदी म्हणाले होते. मात्र आता बेकारी अजून वाढली आहे. गेल्या 10 वर्षात मोदींनी काय केलं असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर हल्ला केला. 

शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मोडनिंब येथे माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. 
 
 
Edited By- Priya Dixit
पुढील लेख
नितीन गडकरींना पुसद सभेत आली भोवळ, अंगरक्षकांनी सावरले