बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (17:34 IST)

मराठा आरक्षण: पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल

औरंगाबाद: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे समाजाला मोठा धक्का बसला आहे. पण, आता पुन्हा मराठा संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने अर्ज करण्यात आला आहे.
 
मराठा संघटनेच्या वतीने केलेल्या या अर्जात नागेश्वर राव खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती देताना इंद्रा सावनी खटल्याचा दाखला दिलेला आहे. यात सर न्यायाधीशांना विनंती केलेली आहे. विनोद पाटील यांच्या वतीने अॅड. संदीप देशमुख यांनी अर्ज दाखल केला.
 
दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे.