शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2017 (14:14 IST)

झोपलेल्या पतीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून मारले

बेळगावात झोपलेल्या पतीच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला पेटवून मारले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला पेटविणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. दीपक भुजंग पवार हे लष्करात नाईक म्हणून सेवा बजावत होते.  दीपक पवार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आंबवडे गावचे होते.  सध्या त्यांची पोस्टिंग बेळगाव इथं होती. सैनिकनगर इथं ते आपली पत्नी सविता आणि आठ वर्षाच्या मुलासह भाड्याच्या घरात राहात होते. पती- पत्नीत काही कारणामुळे वाद होत होते.