1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत टिळकनगर येथे आग पाच जणांचा मृत्यू

mumbai news
टिळकनगरच्या सरगम सोसायटीतील इमारत क्रमांक ३५ च्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली.  आगीत काही नागरीक अडकल्याचे देखील समजत आहे. सध्या या ठिकाणी १५ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या.

आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पण आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या आगीत 5  जणांचा मृत्यू झाला आहे. तर आगीत ५ ते ६ घरे जळून खाक झाली आहेत.  पाचपैकी चारजण ज्येष्ठ नागरिक आहेत. तर पाचव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नातीन दिवसांपूर्वी कांदिवली येथील कापड गोदामाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला.

तर अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत अकरा जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या दोन घटनांना दहा दिवसही होत नाहीत तोच पुन्हा एकदा आगीत पाच जणांचा मृत्यू  झाला आहे.