शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (17:43 IST)

अंबाबाई मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला लागली आग

आज सर्वत्र वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पूजेसाठी वडाच्या झाडाजवळ गोळा होतात. अशातच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात असलेल्या वडाच्या झाडाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. 
 
तर मंदिरातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निरोधक मशीनद्वारे आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या मंदिरात अंबाबाईच्या मंदिरासह अनेक छोटी मोठी मंदिर आहेत आणि परिसरात वडाचे झाड देखील आहे. अशात आज परिसरातील वटपौर्णिमेनिमित्त महिला येथे मोठ्या प्रमाणात येऊन पूजा करत होत्या. वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी महिलांनी चांगलीच गर्दी केली होती. मात्र पूजा सुरु असतानाच वडाच्या झाडाने अचानक पेट घेतला.
 
मोठ्या प्रमाणात येथे पूजा दरम्यान महिला झाडाखाली कापूर आणि उदबत्ती लावत होत्या आणि झाडाला प्रदक्षिणा घेत होत्या. याचवेळी बांधलेल्या दोऱ्याला अचानक आग लागली. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली.
 
आग लागल्याची माहिती मिळताच मंदिर परिसरातील यंत्रणेनी आग विझविण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आणि आग विझवण्यात आली.