सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (08:41 IST)

कमला नेहरू पार्कमध्ये प्रथमच उभारणार काचेचा पूल

social media
वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरातील सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क येथे मुंबई महापालिकेकडून काचेचा पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकर व देश – विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी काचेचा पूल एक वेगळी पर्वणी ठरणार आहे.
 
तसेच, या दोन्ही उद्यानाच्या ठिकाणी वृक्षसंपदा जोपासून वाढविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्कमधील विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. वाळकेश्वर (मलबार टेकडी) च्या माथ्यावर असलेले सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क हे मुंबई शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये गणले जातात. या ठिकाणी निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मुंबईकरांसह असंख्य पर्यटक दररोज भेट देत असतात.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor