शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2017 (12:01 IST)

पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना राळेगणसिद्धीत

first gram rakshak dal established in ralegansiddhi

राज्यातील पहिल्या ग्रामरक्षक दलाची स्थापना अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गावातून करण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत ग्रामरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. राळेगणला नऊ ग्रामरक्षकांची निवड करण्यात आली. ग्रामरक्षक दलाच्या सदस्यातून अध्यक्ष आणि सचिवांची निवड होणार आहे. राळेगणमध्ये 15 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नवनियुक्त सदस्यांना ओळखपत्र दिल जाणार आहे.

सदस्यांची नावे अशी :  हिराबाई नवले, कौशल्या हजारे, शकुंतला औटी, राणी पठारे, रतन पोटे, बाळासाहेब पठारे, सुरेश पठारे, संदीप पठारे, भिमराव पोटे.