बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (14:37 IST)

नियम पाळा आणि टाळेबंदी टाळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या जे जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. कोरोनावरील लस घेण्यात कोणतीही भीती नसल्याचं ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या लसीचे कोणेही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्यांनी ती घ्यावी असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं.
 
लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे असल्याचं ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक टाळेबंदी करावी लागेल असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.
 
दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात लस घेतली. राज्यात काल २ हजार ४२५ लसीकरण केंद्रांवर २ लाख २८ हजार ५५० जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकंदर २३ लाख ५४ हजार २६१ लाभार्थ्यायचं लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.