मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नांदेड , शुक्रवार, 12 मार्च 2021 (10:24 IST)

आजपासून २१ मार्च दरम्यान नांदेडमध्ये अंशतः लॉकडाऊन; अशी आहे नियमावली

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता संपूर्ण राज्यभरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात सुद्धा अंशतः लॉकडाऊन लावण्याची घोषणा जिल्हा अधिकाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊन जरी अंशतः असले तरी त्याची अंमलबजावणी नागरिकांनी काटेकोरपणे करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 
या काळात जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस व आठवडी बाजार १२ मार्च ते २१ मार्चदरम्यान बंद राहतील तर सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. खाद्यगृह, परमिट रूम, बार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यांनाही ५० टक्के क्षमतेचे बंधन घालण्यात आले आहे.
 
जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी तहसीलदारांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. १६ मार्च ते २१ मार्चपर्यंत मंगल कार्यालय, हॉल्स याठिकाणी लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. भाजीमंडई ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. जीम, खेळाची मैदाने हे सुरू राहतील, मात्र कोणत्याही स्पर्धा घेण्यासाठी बंदी राहील.